१. गणेश सहस्त्रावर्तन - सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, परिक्षेत हमखास यश मिळण्यासाटी, श्रीगणेशाची कृपा प्राप्त होण्यासाठी हे सहस्त्रावर्तन केले जातात. प्रारंभी गणपती स्मरण करुन अभिषेकाचा संकल्प केला जातो. गणपती पूजन करुन पुण्याहवाचन करतात. त्यानंतर गणपतीचे आवाहन करुन त्यांना पंचामृतादि स्नान घालतात. पंचोपचार पूजन करुन श्रीगणेशाला ’अथर्वशीर्षाच्या’ १००० आवर्तनांचा अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर त्यांची विधीवत पूजा केली जाते. श्रीगणेशाला दुर्वा अर्चन करुन नैवेद्य दाखविला जातो.

२. देवी अभिषेक - श्रीसूक्त आवर्तन - आपल्या कुलदेवतेचे आशिर्वाद मिळावे, कुलदेवतीची आपल्याकडून सेवा व्हावी, मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासर्व हेतूंसाठी हा श्रीसूक्त अभिषेक केला जातो. प्रारंभी गणपती स्मरण करुन अभिषेकाचा संकल्प केला जातो. गणपती पूजन करुन पुण्याहवाचन करतात. त्यानंतर देवीचे आवाहन करुन त्यांना पंचामृतादि स्नान घालतात. पंचोपचार पूजन करुन देवीला ’श्रीसूक्ताच्या’ १६०० आवर्तनांचा अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर त्यांची विधीवत पूजा केली जाते. देवीला कुंकू अर्चन करुन नैवेद्य दाखविला जातो.

३. देव अभिषेक - पुरुषसूक्त- कुलदैवत, गुरुपादुका किंवा कोणतेही देवांचे आशिर्वाद मिळविण्यासाठी देवांना पुरुषसूक्ताचा अभिषेक केला जातो. प्रारंभी गणपती स्मरण करुन अभिषेकाचा संकल्प केला जातो. गणपती पूजन करुन पुण्याहवाचन करतात. त्यानंतर त्या देवतेचे आवाहन करुन त्यांना पंचामृतादि स्नान घालतात. पंचोपचार पूजन करुन त्या देवतेला ’पुरुषसूक्ताच्या’ १६०० किंवा १६० आवर्तनांचा अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर त्यांची विधीवत पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखविला जातो.

४. रुद्राभिषेक - श्रीगुरुपादुकांना किंवा विशेषतः महादेवाला याचा अभिषेक करतात. प्रारंभी गणपती स्मरण करुन अभिषेकाचा संकल्प केला जातो. गणपती पूजन करुन पुण्याहवाचन करतात. त्यानंतर महादेवाचे आवाहन करुन त्यांना पंचामृतादि स्नान घालतात. पंचोपचार पूजन करुन महादेवाला ’लघुरुद्राच्या’ १२१ आवर्तनांचा अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर त्यांची विधीवत पूजा केली जाते. महादेवाला बिल्व अर्चन करुन नैवेद्य दाखविला जातो.