Ek Lingato Bhadra Mandal Navgraha Mandal Sarvato Bhadra Mandal Matruka Mandal Punyaha Mandal Ganesh Mandal

नवग्रहांच्या सविस्तर माहितीसाठी

एकुण बारा ग्रह आहेत. ह्या बारा ग्रहांवर संपुर्ण ज्योतिष शास्त्र अवलंबून आहे. ह्या ग्रहांवर ज्योतिष शास्त्राची सम्पूर्ण इमारत आहे. हे ग्रह त्यांचे स्वभाव, त्यांचे गुणधर्म, त्यांच्या आवडीनिवडी यांचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो.

आपल्या जीवनात अनेकदा आपल्यावर ईष्ट अनिष्ट कालाचे, सुखदु:खाचे अनेकदा बरे-वाईट असे प्रसंग येतात. अनुकूल सुखावह परिस्थितीमध्ये आपल्या बुधिबलाचा, द्रव्याचा, वैभवाचा आणि नातेवाईकांच्या सहकार्याचा उपयोग होतो. परंतु आपल्या अनिष्ट, संकटकाळी या साधनांचा तिळमात्रही उपयोग होत नाही त्यावेळी आपल्या कुंडलीतील ग्रहांची अशुभ दृष्टी सुरु झालेली आहे, असे आपण समजतो आणि त्या ग्रहाची उपासना सुरु करतो.

प्रत्येक ग्रह हा कुठल्या राशीमध्ये शुभ - अशुभ आहे. कुठल्या ग्रहाचा मित्र आहे. कुठल्या ग्रहाचा शत्रु आहे. त्या ग्रहांची उपासना कशी करता येईल, त्यांचा जप किती आहे? जपसंख्या किती आहे? दान काय आहे ह्यांची माहिती पुढे देत आहोत.

नवग्रह शांतीची यादी