शांती प्रकरणात सांगितल्याव्यतिरीक्त अजून काही शांती आहेत. त्या क्वचितच दर्शनास येतात.

  • ग्रहण जनन शांती - ग्रहण असतांना जन्म झाला असल्य.
  • यमल जनन शांती - जुळे अपत्य झाले असल्यास.
  • त्रिकप्रसव शांती - ३ मुलींनंतर १ मुलगा किंवा ३ मुलांनंतर १ मुलगी जन्मल्यास.
  • सदंत जनन शांती - जन्मतः दात असल्यास.
  • दिनक्षय शांती - तिथी क्षय झाली असल्यास.
  • काकस्पर्श शांती - कावळ्याचा स्पर्श झाल्यास.
  • पल्लीमरठ शांती - पाल अंगावरती पडल्यास.
  • विनायक शांती - सर्व अरिष्ट दूर होण्यासाठी.

या सर्व शांतींचा विधी नवग्रह, नक्षत्र शांतींप्रमाणेच आहे. परंतु प्रधान देवता मात्र वेगळी आहे.

ब्राह्मणांना दक्षिणा तसेच विशेष दान द्यावे. आशिर्वाद घेऊन शांतिची सांगता करावी.

नंतर अग्नीदेवतेची, इष्ट्देवतेची प्रार्थना करुन होमविभूती धारण करावी. आयुष्य वाढीसाठी कास्यपात्रात तूप घेऊन मुखावलोकन करावे. ब्राह्मणांना पीठदान, दशदान द्यावे.

नवग्रह शांतीची यादी

योग शांती यादी