नवग्रहांच्या सविस्तर माहितीसाठी

या नक्षत्राची शांती करतांना त्या दिवशी ते नक्षत्र असणे आवश्यक आहे. शक्य न झाल्यास शुभ दिवशी अग्नी वास असतांना करावी. या नक्षत्राच्या दिवशी सकाळी स्नान करुन शुचीर्भूत व्हावे. पूर्व दिशेला मांडणी करावी. यजमानांच्या कपाळाला तिलक लावून शांतीसुक्त म्हणावे. प्रधान संकल्प करावा.

या शांतीच्या अंगीभूत म्हणून गणेश पूजन, पुण्याहवाचन करावे. १६ मातृकांचे पूजन करून नांदीश्राद्ध करावे. आचार्यादीवरण, दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन करावे. कुंडावर पंचभूसंस्कार करुन अग्नी स्थापन करावा. ( हवनाच्या वेळी अग्नी स्थापन केला तरी चालेल) चौरंगावर मध्यभागी १ आणि चार दिशांना चार असे पंच कलश स्थापन करावे. मधल्या कलशात पाणी, पंचरत्न, सप्तधान्य घालावे. रुद्र मंत्र किंवा रुद्रसूक्त म्हणून कलश अभिमंत्रित करावा. पूर्व दिशेला कलश ठेऊन त्यात पाणी, पंचगव्य, पंचामृत घालुन ईंद्र मंत्र किंवा सूक्त म्हणावे. दक्षिण दिशेला कलश ठेऊन त्यात पाणी, सर्वौषधी, तीर्थोदक घालावे, मृत्युंजय मंत्र, सूक्त म्हणावे. पश्चिम दिशेला कलश ठेऊन त्यात पाणी माती, वनस्पती घालावे. वरुण मंत्र, सूक्त म्हणावे. ऊत्तर दिशेला कलश ठेऊन त्यात पाणी, फूल, अत्तर, मोहरी, पंचपल्ल्व घालावे. विष्णु मंत्र किंवा विष्णुसूक्त म्हणावे. मधल्या कलशावर ताम्हण ठेवून त्यावर महादेवाची स्थापना पूजन करावे.
शेजारी एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र घालावे. अष्टदल मांडून मध्ये कलश स्थापन करावा. ताम्हण ठेवावे. ताम्हणात जन्म नक्षत्र देवता मांडावी. डावीकडे आधीचे नक्षत्र देवता मांडावी. ऊजवीकडे त्यानंतरची देवता मांडावी.

  ज्येष्ठा नक्षत्र

  इन्द्र देवता

  मूळ नक्षत्र

  नित्रदती देवता

  पूर्वाषाढा नक्षत्र

  उदक देवता

अष्टदलामध्ये आठ दिशांना २४ नक्षत्र देवता मांडून त्यांची विधीवत पूजा करावी. त्यानंतर अग्नीस्थापना करुन ४४ देवतांच्या नवग्रहमंडलाची स्थापना करावी. शेवटी रुद्रपूजन करावे. अग्नीवर संस्कार करावे. ब्रह्मपीठाची पूजा करावी. हवन सुरु करावे.

हवन - प्रारंभी गणेशाचे हवन करुन नवग्रह मंडलाचे ( ८ - ४ - २ - १ ) या प्रमाणात हवन करावे. मग जन्मनक्षत्र देवतेचे हवन करावे. त्यानंतर २६ नक्षत्र देवतांचे हवन करावे. गुग्गुल होम, सर्षप होम, लक्ष्मी होम झाल्यानंतर स्थापित देवतांचे उत्तरांग पूजन करावे. अग्नीला स्वीष्टकृत द्यावे. दाही दिशा तसेच स्थापित मंडल देवता यांचे बलीपूजन करावे. नंतर क्षेत्रपाल पूजन करुन शेवटी यागाची महाआहुती म्हणजेच पुर्णाहुती द्यावी. शिल्लक राहिलेल्या तुपाची आहुती द्यावी. भस्मधारण, संस्त्रवप्राशन करुन ब्रह्मापूजन करावे. यजमानांना श्रेयोदान द्यावे. आणि स्थापित कलशातील पाणी घेउन अभिषेक करावा.

सर्व ब्राह्मणांना दक्षिणा देउन त्यांच्याकडून आशिर्वाद घ्यावा.

या नक्षत्र शांती निमित्त आचार्यांना पीठ दान, भूमी दान, तीळ दान, तूप दान, गाय दान, सोने दान तसेच सप्त धान्य दान द्यावे.

नवग्रह शांतीची यादी