Previous Page     |      Next Page

नवचंडी यागात प्रथम नवपीठांची मांडणी करुन प्रधान संकल्प करावा.

प्रारंभी गणेशाचे पूजन करुन पुण्याहवाचन, मात्रुकापूजन, आयुष्यमंत्रजप, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन करुन ब्रह्मादि वास्तु मंडलाची स्थापना करावी. ६४ देवता असलेल्या योगिनी मंडलाची स्थापना करावी. ५१ देवतेच्या क्षेत्रपाल मंडलाची स्थापना करुन त्यानंतर प्रधान मंडल असलेल्या सर्वतोभद्र मंडलाची स्थापना करावी. सर्वतोभद्र मंडल आणि त्याच्या ५६ देवता यांची माहिती पुढे देत आहोत.

सर्वतोभद्र मंडल

 • १. ब्रह्मणे नमः
 • २. सोमाय नमः
 • ३. ईशानाय नमः
 • ४. ईन्द्राय नमः
 • ५. अग्नये नमः
 • ६. यमाय नमः
 • ७. निरुतये नमः
 • ८. वरुणाय नमः
 • ९. वायवे नमः
 • १०. अष्टवसुभ्यो नमः
 • ११. एकदशरुद्रेभ्यो नमः
 • १२. द्वादशादित्येभ्यो नमः
 • १३. अश्विभ्यां नमः
 • १४. विश्वेभ्यो देवेभ्यो नमः
 • १५. सप्तयक्षेभ्यो नमः
 • १६. सर्पेभ्यो नमः
 • १७. गंधर्वाप्सरेभ्यो नमः
 • १८. स्कंदाय नमः
 • १९. नंदीश्वराय नमः
 • २०. शूलमहाकालाभ्यां नम:
 • २१. दक्षादि सप्तगणेभ्यो नम:
 • २२. दुर्गायै नमः
 • २३.विष्णवे नमः
 • २४. स्वधायै नमः
 • २५. म्रुत्युरोगेभ्यो नमः
 • २६. गणपतये नमः
 • २७. अद्भ्यो नमः
 • २८. मरुद्भ्यो नमः
 • २९. भूम्यै नमः
 • ३०. गंगादिनदीभ्यो नमः
 • ३१. सप्तसागरेभ्यो नमः
 • ३२. मेरवे नमः
 • ३३. गदायै नमः
 • ३४. त्रिशुलाय नमः
 • ३५. वज्राय नमः
 • ३६. शक्तये नमः
 • ३७. दंडाय नमः
 • ३८. खड्गाय नमः
 • ३९. पाशाय नमः
 • ४०. अंकुशाय नमः
 • ४१. गौतमाय नमः
 • ४२. भरद्वाजाय नमः
 • ४३. विश्वामित्राय नमः
 • ४४. कश्यपाय नमः
 • ४५. जमदग्नये नमः
 • ४६. वसिष्ठाय नमः
 • ४७. अत्रये नमः
 • ४८. अरुंधत्ये नमः
 • ४९. ऎंद्रै नमः
 • ५०. कौमार्यै नमः
 • ५१.ब्राह्म्यै नमः
 • ५२. वाराह्यै नमः
 • ५३. चामुण्डायै नमः
 • ५४. वैष्णव्यै नमः
 • ५५. माहेश्वर्यै नमः
 • ५६. वैनायक्यै नमः

ह्या ५६ देवतांच्या सर्वतोभद्र मंडलाची स्थापना झाल्यानंतर त्यावर प्रधान कलश स्थापन करुन त्यावर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, यंत्र, कुलदेवता या प्रतिमांची प्राणप्रतिष्ठा करुन षोडशोपचार पूजा करावी. अर्चन करावे. ब्राह्मण द्वारा प्रधान संकल्पाप्रमाणे सप्तशतीचे दहा पाठ वाचावे. त्यानंतर अग्नीस्थापना करुन ४४ देवतांच्या नवग्रहमंडलाची स्थापना करावी. शेवटी रुद्रपूजन करावे. अग्नीवर संस्कार करावे. ब्रह्मपीठाची पूजा करावी. हवन सुरु करावे.

हवन - प्रारंभी गणेशाचे हवन करुन नवग्रह मंडलाचे ( ८ - ४ - २ - १ ) या प्रमाणात हवन करावे. मग सप्तशतीचे हवन करावे. देवीचे हवन करावे. त्यानंतर पीठदेवता, यंत्रदेवता सहित स्थापित मंडल देवतांचे हवन करावे. गुग्गुल होम, सर्षप होम, लक्ष्मी होम झाल्यानंतर स्थापित देवतांचे उत्तरांग पूजन करावे. अग्नीला स्वीष्टकृत द्यावे. दाही दिशा तसेच स्थापित मंडल देवता यांचे बलीपूजन करावे. देवीला कोहळ्याचा बली द्यावा. नंतर क्षेत्रपाल पूजन करुन शेवटी यागाची महाआहुती म्हणजेच पुर्णाहुती द्यावी. शिल्लक राहिलेल्या तुपाची आहुती द्यावी. भस्मधारण, संस्त्रवप्राशन करुन ब्रह्मापूजन करावे. यजमानांना श्रेयोदान द्यावे. आणि स्थापित कलशातील पाणी घेउन अभिषेक करावा.

सर्व ब्राह्मणांना दक्षिणा देउन त्यांच्याकडून आशिर्वाद घ्यावा.

नवचंडी यागानिमित्त आचार्यांना पीठ दान, भूमी दान, तीळ दान, तूप दान, गाय दान, सोने दान तसेच सप्त धान्य दान द्यावे. कुलस्वामिनी स्वरुप अश्या १, ३, ९ कुमारीकांचे पूजन करावे. देवीला नैवेद्य दाखवावा. आरती करुन सर्वांनी देवीची क्षमा मागावी. शेवटी देवीची स्तुती, प्रार्थना करुन यागाची सांगता करावी.

या पद्धतीनेच शतचंडी याग करता येतो. हा शतचंडी याग ३, ५, ७, ११ दिवसांमध्ये करता येतो. या शतचंडी यागामध्ये सर्व मंडलांची स्थापना झाल्यानंतर ब्राह्मणद्वारा सप्तशतीचे १०० पाठ वाचावे आणि दहा पाठांचे हवन करावे. दररोज सकाळी स्थापित देवतांचे प्रातःपूजन करावे आणि संध्याकाळी सायंपूजन करावे.

विशेष टीप - आपण शतचंडी याग करण्याबाबत ऊत्सुक असाल तर आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला या शतचंडी यागाचे स्वरुप कसे असेल, याची माहिती देउ.

Previous Page     |      Next Page

योग शांती यादी