मानवी जीवनाचे सर्व अंग विकसीत व्हावे, माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्व अंगाने खुलावे, तो उत्तम पुरुष व्हावा, या करिता प्राचीन काळी समाजकर्त्यांनी हे सोळा संस्कार घालून दिले आहेत. मानवावर जर हे संस्कार केले तर त्याचा फार मोठा परिणाम त्याच्या जीवनावर होत असतो. त्याचे जीवन हे प्रभावशाली असे बनते.

आपल्या माहितीसाठी खाली हे सोळा संस्कार देत आहोत.

 • गर्भाधान संस्कार
 • पुंसवन संस्कार
 • सीमंतोनयन संस्कार
 • जात कर्म संस्कार
 • नामकर्म संस्कार
 • निष्क्रमण संस्कार
 • अन्नप्राशन संस्कार
 • चौल संस्कार
 • कर्णवेध संस्कार
 • उपनयन संस्कार
 • वेदारंभ संस्कार
 • समावर्तन संस्कार
 • विवाह संस्कार
 • सर्वसंस्कार
 • संन्यास संस्कार
 • अंत्येष्ठी संस्कार.

या सोळा संस्कारांपैकी कोणताही एक संस्कार आपणास करावयाचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. सोबत जातकाचे नाव, जन्मदिनांक, जन्मवेळ, जन्मठिकाण कळवावे.

सर्व देव प्रतिष्ठा

एखाद्या ठिकाणी जर देवतेचे देवालय बांधलेले असेल तर त्या देवालयात त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा हा विधी करावा लागतो. हा विधी कमीतकमी ३ दिवसांचा असतो. सर्व प्रथम दशविध स्नान करावे. प्रायश्चित्त घ्यावे, गोदान द्यावे. नूतन जानवे घालावे. नवपीठांची मांडणी करुन शांतीसूक्त म्हणावे. देवता निमंत्रण द्यावे. प्रधान संकल्प करावा.

प्रारंभी गणेशाचे पूजन करुन पुण्याहवाचन, मातृकापूजन, आयुष्यमंत्रजप, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, मंडप प्रवेश - पूजन दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन करुन ब्रह्मादि वास्तु मंडलाची स्थापना करावी. ६४ योगिनी मंडलाची स्थापना करुन ५१ देवतेच्या क्षेत्रपाल मंडलाची स्थापना करावी. जलयात्रा प्रयोग करावा. सागराचे, जलमातृकांचे पूजन करावे. त्यानंतर प्रधान मंडलाची स्थापना करावी. ( गणपती असल्यास गणेशभद्रमंडल, शिव असल्यास द्वादशलिंगतोभद्रमंडल, लक्ष्मी असल्यास देवीभद्रमंडल अशाप्रकारे प्रधान मंडल घ्यावे)