Previous Page     | 1 | 2 | 3 |      Next Page

Ek Lingato Bhadra Mandal Navgraha Mandal Sarvato Bhadra Mandal Matruka Mandal Punyaha Mandal Ganesh Mandal

नवग्रहांच्या सविस्तर माहितीसाठी

आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचे एकच स्वप्न असते. आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज इत्यादि मिळूनही आपल्या घराचे स्वप्न साकार होतेच असे नाही. ते स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते. ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु लाभ पहातात.

दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यति असाच असतो. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजार हे घेतात. मग आपणास शंका येते की, आपल्या या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का? आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की, आपण आपल्या वास्तुची शांती केली नाही. मग आपण आमच्याकडे येतात. आम्ही योग्य तो वास्तुचा मुहुर्त काढून देतो.

आपल्या माहितीसाठी वास्तुशांतीसाठी वर्ज्य (अशुभ) असलेले दिवस देत आहे. त्याची आपण वास्तुशांती करीत असतांना दखल घ्यावी.

महिना -- चैत्र संपूर्ण, अश्विन संपूर्ण, व अधिक महिना.
तिथी -- अमावस्या, क्षयतिथी, रिक्ततिथी.
वार -- रविवार, मंगळवार.
हे दिवस वास्तुशांती साठी वर्ज्य आहेत.

वास्तुशांती करतांना प्रत्यक्षात काय केले जाते, याचा आढावा घेऊ.

प्रथम आपण आपली जागा शुद्ध करावी. आम्ही गुरुजी तुमच्याकडे येऊन पूर्व दिशेला वास्तुशांतीची संपूर्ण मांडणी करतो. पूजेची सर्व तयारी करावी. यजमानांनी सपत्नीक स्नान करुन सोवळे नेसून वास्तुमंडपामध्ये प्रवेश करावा. आसनावर बसावे. आपल्यासमोर तांब्या, ताम्हण, पेला-पळी ठेवावे.गुरुजी यजमानांना स्वस्तितिलक लावतात. पवित्र धारण करण्यासाठी देतात. केशवादि आचमन करुन प्राणायाम करावा. शांतीसूक्ताचा संकल्प करून यजमानांनी देवापुढे विडा, नारळ ठेऊन देवांना वास्तुशांतीसाठी आमंत्रण द्यावे. देव, ब्राह्मण, उपस्थित थोर मंडळीस नमस्कार करून देव घेउन आसनस्थ व्हावे. आचमन करून प्राणायाम करावा.

प्रधान संकल्प - यजमानांच्या हातामध्ये पाणी, अक्षता, फूल, नाणे, सुपारी देउन संकल्प करावा. संकल्प म्हाणजे आज मी या पृथ्वीवर कोठे बसलेला आहे, आजची आकाशातील ग्रहांची स्थिती काय आहे, आज तिथी, वार, नक्षत्र, योग, करण कोणते आहे, यालाच पंचांग म्हणतात. या पंचांगांचा उल्लेख करून आपल्या गोत्राचा उच्चार करावा. आपले स्वतःचे नाव घेउन मी ही पूजा कोणासाठी, कश्यासाठी करणार आहे, मला याने काय मिळावे, याचा उल्लेख करून विशेष असा वास्तुशांतीचा संकल्प केला जातो.

वास्तुशांती संकल्प - माझी ही जागा बांधतांना सर्वप्रथम या जमिनीवर जे संस्कार केले गेले, ते संस्कार करीत असतांनी भूमीदेवतेला जे दुःख झाले असेल. जमीन खणणे, तोडणे, कापणे, भाजणे, भिजवणे, तुडवणे, कांडणे, कमी जास्त करणे, उंच सपाट करणे, हे करीत असतांना, तसेच जमीनीतून सुवर्ण, रजत, ताम्र, तपु, सीसक, कांस्य, लोह, पाषाण इत्यादि काढुन घेत असतांना जे दोष निर्माण झाले असतील तसेच कीटक, क्रुमी यांची हत्या झाल्यामुळे निर्माण झालेले जे दोष असतील, ते सर्व दोष निघुन जाऊन मला माझ्या या नवीन जागेमध्ये सदासर्वदा सुखशांती लाभावी, मनातील हेतू पूर्ण व्हावे, शत्रूंचा नाश होऊन माझ्या कुटुंबातील सर्वांना दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे. धनधान्य, पुत्र, पौत्र, किर्ती, यश लाभ मला प्राप्त व्हावे. वास्तुपुरुषाचा आशिर्वाद मला प्राप्त व्हावा, नवग्रह मला अनुकुल व्हावे. म्हणून मी आज वास्तुशांती करीत आहे. असा प्रधान संकल्प करावा. नंतर या वास्तुशांतीचे अंगभूत म्हणून मी गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यादिवरण, दिग्रक्षणम, पंचगव्यकरण, भूमीपूजन, स्थंडील निर्माण, संस्कार, अग्नीस्थापना, वास्तुमंडल देवता स्थापना, प्रधान कलश स्थापन, वास्तुसहित ध्रुव देवता पूजन, नवग्रहमंडल देवता स्थापन, रुद्रपूजन करुन नंतर हवन, उत्तरपूजन, बलीदान, पुर्णाहुती, वास्तुनिक्षेप करतो, असा दुसरा संकल्प केला जातो.

गणपती स्मरण करुन कलश पूजन, शंख - घंटा पूजन, दिपपूजन, आदित्यपूजन, आसन पूजन केले जाते.

Previous Page     | 1 | 2 | 3 |      Next Page

नवग्रह शांतीची यादी