आपले आयुष्य म्हणजे इहलोकांत रहाण्याची कालमर्यादा, जीवनमर्यादा आहे.ती आपल्या पुर्वजन्मातील कर्मानुसार परमेश्वराने गर्भावस्थेत असतांनाच नियमीत केलेली असते. आपल्या आयुष्याच्या बाल्य, तारुण्य, वार्धक्य अश्या तीन अवस्था मांडलेल्या आहेत. जन्मापासुन २५ वर्षांपर्यंत बाल्य अवस्था, २५ ते ५० वर्षांपर्यंत तारुण्य, आणि ५० वर्षांच्या पुढे वार्धक्य अवस्था मानलेल्या आहेत.

या वार्धक्य अवस्थेत शरीराच्या ठिकाणी अनेक आघात, आजार, इंद्रिय वॆफल्य होण्याचा संभव असतो, तो टाळून पुढील आयुष्य सुखाने जावे म्हणुन आपल्या शास्त्रामध्ये पूर्वजांनी वयाच्या ५० वर्षांपासून १०० वर्षांपर्यंत दर ५ वर्षांनी शांती सांगितल्या आहेत. त्यांनाच वयोवस्थ शांती असे म्हणतात. या वयोवस्थाप्रमाणे आपले जे वय वर्षे चालू असेल, ती शांती आपन करावी. शक्यतो ही शांती आपल्या जन्मदिनाच्या ( जन्मनक्षत्र) असेल त्या शुभदिवशी करावी. शक्य नसल्यास पुढे पंचांग पाहून करावी.

या वयोवस्थ शांतीचा विधी कसा असेल याची माहिती आपणास मिळावी, या हेतुने थोड्क्यात विधी पुढे देत आहोत.

जन्मनक्षत्रच्या दिवशी यजमानांना सपत्नीक मांगलीक स्नान घालून नेसण्यासाठी नुतन वस्त्र द्यावे. आम्ही पुरोहित येउन खालीलप्रमाणे मांडणी करतो. शांतीसूक्त म्हणून प्रधान संकल्प करतात.

प्रारंभी गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करून गोत्र उच्चार करावा. ब्राह्मणांना वर्णी देऊन दिग्रक्षणम, पंचगव्य, भूमीपुजन करून अग्नी स्थापन करावा. (हवनाच्या वेळी अग्नी स्थापन केला तरी चालतो.) प्रधानमंडल (सर्वतोभद्र मंडल) देवता स्थापन करून कलश स्थापन करावा. या वयोवस्थ शांतीच्या प्रधान देवता - उपदेवता - जन्मनक्षत्र देवता यांच्या प्रतिमेचे पुजन करावे. नवग्रह मंडल, रुद्र कलश स्थापन करून हवन करावे. उत्तरांग पूजन करून बलीदान, पूर्णाहुती करावी. ब्राह्मणांना दक्षिणा तसेच विशेष दान द्यावे. आशिर्वाद घेऊन शांतिची सांगता करावी.

नंतर अग्नीदेवतेची, इष्ट्देवतेची प्रार्थना करुन होमविभूती धारण करावी. आयुष्य वाढीसाठी दूध प्यावे. कास्यपात्रात तूप घेऊन मुखावलोकन करावे. ब्राह्मणांना पीठ्दान, दशदान द्यावे. यजमानांच्या मुलांनी यजमानांना वस्त्र, पुष्पमाला भेटी देऊन त्यांचा मानसन्मान करावा. ५ किंवा ७ सुवासुनींनी यजमानांचे जितके वय असेल तितके दिप ओवाळावे. तुलादान विधी करावा.

अश्याप्रकारे वयोवस्थ शांतीचा विधी आहे. कोणत्या वर्षी कोणती शांती आहे, जन्मनक्षत्र देवता कोणती आहे, याची माहिती देत आहोत.

नवग्रह शांतीची यादी

योग शांती यादी