आपल्या जन्माच्या वेळी जर व्यतिपात योग आला असेल तर ज्योतिष अभ्यासाप्रमाणे अशुभ मानले जाते. तो दोष घालविण्यासाठी व्यतिपात शांती करावी लागते. शांती करतांना त्यादिवशी व्यतिपात योग असेल तर उत्तमच. प्रथम गणपती स्मरण करुन हातात पाणी घेऊन व्यतिपात योग शांतीचा संकल्य करावा.

प्रारंभी गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करून गोत्र उच्चार करावा. ब्राह्मणांना वर्णी देऊन दिग्रक्षणम, पंचगव्य, भूमीपुजन करून अग्नी स्थापन करावा. (हवनाच्या वेळी अग्नी स्थापन केला तरी चालतो.) मध्यभागी चौरंगावर पीस मांडून त्यावरती तांदुळाचे अष्टदल मांडावे. त्यामध्ये ३ कलश स्थापन करावे. या व्यतिपात योग शांतीच्या प्रधान देवता - सूर्य, रुद्र, अग्नी यांच्या प्रतिमेचे प्राणप्रतिष्ठा करुन अभिषेक करावा. विधीवत पुजन करावे. नवग्रह मंडल, रुद्र कलश स्थापन करून अग्नी स्थापना, संस्कार करावे. सुरवातीला गणपतीचे हवन करावे. नवग्रहांच्या ४४ देवतांचे हवन करावे. रुद्र, सूर्य, अग्नी यांचे १०८ वेळा हवन करावे. उत्तरांग पूजन करून बलीदान, पूर्णाहुती करावी.

ब्राह्मणांना दक्षिणा तसेच विशेश दान द्यावे. आशिर्वाद घेऊन शांतिची सांगता करावी.

नंतर अग्नीदेवतेची, इष्ट्देवतेची प्रार्थना करुन होमविभूती धारण करावी. आयुष्य वाढीसाठी कास्यपात्रात तूप घेऊन मुखावलोकन करावे. ब्राह्मणांना पीठदान, दशदान द्यावे.

नवग्रह शांतीची यादी

योग शांती यादी